पनवेल,दि.25: केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आणीबाणी कालावधीत लोकशाहीचा लढा व बंदिवास भोगावा लागलेल्या मान्यवरांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 25 जुन रोजी आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये करण्यात आले. यानिमित्ताने नाट्यगृहाच्या तळमजल्यावरती आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आणीबाणी विशेष स्मरण प्रदर्शन’ 2 जुलपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दिनांक २५ जून 1975 ते दिनांक 3 मार्च 1977 या कालावधीत आणीबाणी घोषित करण्यात आली होती. याघटनेला 50 वर्षे पूर्ण होत असताना त्या अनुषंगाने केंद्र सरकारमार्फत तयार करण्यात आलेले ‘आणीबाणी विशेष स्मरण प्रदर्शन’ आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानूसार आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या तळमजल्यावरती ‘आणीबाणी विशेष स्मरण प्रदर्शन’ 2 जुलैपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.