नवी मुंबई : शेजारी राहणाऱ्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह तिच्याच घरात लपवल्याची खळबळजनक घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे. नवी मुंबईमधील तळोज्यामध्ये हा प्रकार घडला आहे, यानंतर पोलिसांनी आरोपी मोहम्मद अन्सारीला अटक केली आहे. शेजारी राहणाऱ्या मुलीची हत्येचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले आहेत. मोहम्मद अन्सारीच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या अमरिश शर्मा यांच्या पत्नीसोबत मुलांच्याशर्मा कुटुंबासोबत वाद तसंच मोबाईल गेमच्या व्यसनामध्ये मोहम्मद अन्सारी पैसे हरला होता, यातून मोहम्मद अन्सारीने अमरिश शर्मा यांच्या मुलीला मारण्याचा कट रचला. संधी मिळताच मोहम्मद अन्सारीने अमरिश शर्मा यांच्या मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह तिच्याच घरातील शौचालयाच्या कट्ट्यावर एका बॅगमध्ये ठेवला.