कराच्या थकीत रक्कमेत कोणतीही सवलत नसून मूळ मालमत्ता कर तसेच सवलतीनंतरच्या शास्तीसह येणारी संपूर्ण देय रक्कम एकरकमी भरणा करणे आवश्यक आहे.
• या योजनेच्या प्रारंभापूर्वी अथवा समाप्तीनंतर भरणा केलेला मालमत्ता कर तसेच शास्ती / व्याजाच्या रकमेच्या संदर्भात कोणतीही सूट मिळणार नाही तसेच त्यांचा परतावा देखील मिळणार नाही.
• अभय योजना कालावधीत अभय योजनेअंतर्गत नमूद केलेल्या भरणा करावयाच्या रक्कमेपेक्षा जादा भरणा केलेल्या रक्कमेचा परतावा मिळणार नाही.
• अभय योजनेचा लाभ घेऊन कराचा भरणा केल्यानंतर सदर भरणा रकमेसंदर्भात कोणत्याही प्राधिकरणापुढे / न्यायाधिकरणापुढे कोणत्याही कारणास्तव दावा दाखल करता येणार नाही.
• ज्या कालावधीसाठी सवलतीचा लाभ घ्यावयाचा आहे, त्या कालावधीसंबंधी कोणतेही प्रलंबित अपिल, पुनर्निरीक्षणासाठी असलेले आवेदन, संदर्भ आवेदन, मा. न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका प्रलंबित असल्यास ते विनाअट मागे घेतले पाहिजे.
• जर अभय योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अपील, पुनर्निरीक्षण आवेदन, संदर्भ आवेदन, मा. न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका दाखल केली तर अभय योजनेनुसार संबंधित कालावधीसाठी दिलेल्या सवलती काढून घेण्यात येतील.
• या व्यतिरिक्त महानगरपालिका ठरावात नमूद असलेल्या अभय योजनेतील इतर बाबींची अंमलबजावणी / मान्यतेचे अंतिम अधिकार महापालिका आयुक्त यांचे राहतील.