RNI ; कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनच्या मासिका सकट 99,173 वृत्तपत्रावर बंदी!

 

उल्हासनगर : 10/AS/2014-2015 TC, दिनांक 17 मार्च 2022 च्या पत्राच्या DEFUNCT यादी नुसार एकूण 99,173 नोंदणीकृत स्थानिक वृत्तपत्रांना भारतातील वृत्तपत्रांच्या निबंधक कार्यालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, दिल्ली कार्यालयाने नोंदणीकृत वृत्तपत्राच्या मालकांना/संपादकांना निष्क्रिय यादीत समाविष्ठ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महाष्ट्रातील स्थानिक नोंदणीकृत वृत्तपत्रानवर ही कायमची बंदी कशी आणता येईल यावर मोदी सरकारने विविध कायदे/नियमावली आणली आहे. जेणे करून स्थानिक पातळीवर जनतेच्या समस्या उघडकीस आणणाऱ्या मालक/संपादकांचा आवाज कायमचा बंद कसा करता येईल या दृष्टीने काम करत आहे. याकरिता संबंधित संघटनांनी एकत्र येऊन यावर आवाज उठवला पाहिजे नाही तर कालांतराने भारतातून प्रिंट मीडिया नोंदणी कायमची हद्द पार होईल.

त्यात अनेक असे व्हेरिफिकेशन/नोंदणीकृत जुने वृत्तपत्र आहेत त्यांना ही ‘for republication’ करिता विविध कारणे देत PRGI कडून रीजेक्ट करत आहेत.

त्याच बरोबर महाराष्ट्र शासना चे ही सर्व मासिके RNI कार्यालयाकडून DEFUNCT लिस्ट मध्ये शामिल करण्यात आले आहे. जसे की #लोकराज्य (MAHURD/2007/22846) व #महाराष्ट्रहेड (MAHENG/2011/75502) त्यामुळे वेगवान शासनाने या विषयावर गांभीर्याने विचार करत महाराष्ट्रातील संबंधित जुने नोंदणीकृत वृत्तपत्र/मासिके कसे नियमित/पुनःप्रकाशीत करता येतील यावर उपाय योजना करत पाठपुरावा करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *