पनवेल महापालिकेतील खारघर नोड मधील सेक्टर ३० येथील प्लॉट नंबर ५० वर अवैध रित्या भंगार माफियांचे अतिक्रमण वाढत चालले होते, या भंगार माफियांमध्ये अनेकदा वाद होत असलयाचे पाहायला मिळाले, अनधिकृतरित्या अतिक्रमण करणाऱ्या भंगार माफियांनी नागरिकांचे जगणे मुशकील करून टाकले होते, आणि थेतील जागरूक रहिवाशी श्री मुकेश याही सिडको मध्ये तक्रार केली , या ठिकाणी वारंवार होणाऱ्या कटकटीला कंटाळून परिसरातील नागरिकांनी मीडिया ९ वृत्तवाहिनीसमोर आपली समस्या मांडली. मीडिया ९ ने नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या समस्या सिडको पुढे मांडल्या, सिडको ने याची दखल घेत अनधिकृतरित्या अतिक्रमण केलेल्या भंगार माफियांवर कारवाई केली, हि कारवाई कार्यकारी अभियंता सिडको श्री नंदकुमार बाळकृष्ण कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली श्री मंगेश गोंधळी सहाय्यक कार्यकारी अभियंता, श्री प्रतिमा जाधव सहाय्यक अभियंता यांच्यावतीने करण्यात आली. या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला, अतिक्रमण हटवल्यामुळे नागरिकांनी सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे आणि सिडको अधिकारी श्री नंदकुमार बाळकृष्ण कुलकर्णी , व त्यांच्या टीम चे आभार मानले. आणि भविष्यातही असे काही अनधिकृत बांधकाम आढळले कि त्यावर हि सिंघम स्टाईल ने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता सिडको यांच्या मार्फत देण्यात आले . तसेच कमी वेळात कारवाई झाल्यामुळे नागरिकांनी कामाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.