अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ

एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार

अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांसह ८ मंत्र्यांना शपथ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला.

राजभवन येथे रविवारी दुपारी झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.

यावेळी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे व अनिल पाटील यांना देखील मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *