मुंबई, ०४ जून, २०२३: मुंबईतील आघाडीच्या बांधकाम व्यावसायिक असलेल्या सुगी ग्रुपने, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या सहकार्याने वॉक फॉर द क्लायमेट चेंज’ या अनोख्या वॉकेथॉनचे आज जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील दादर येथे आयोजन केले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना कायम समुद्रकिनारा स्वच्छता आणि इतर पर्यावरण संरक्षणासंबंधी उपक्रम हाती घेत असते. याचाच एक भाग म्हणून, जगभरात 5 जून 2023 रोजी साजरा होत असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘हवामान बदलासाठी चालणे’ हा संदेश देत सुगी ग्रुप आणि मनसे यांनी संयुक्तपणे हा वॉकेथॉनचा उपक्रम आयोजित केला होता.
समाजातल्या प्रत्येक क्षेत्रातील लोकांमध्ये वातावरणीय बदलांच्या गंभीर समस्येबद्दल जागरूकता निर्माण करून या समस्येच्या निराकरणासाठी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर उपाय शोधून या विषयावर सकारात्मक संवाद होण्यासाठी प्रवृत्त करणे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता.
आज दादर मुंबई येथे आयोजित केलेल्या वॉकेथॉनमध्ये सर्व वयोगटातील आणि स्तरातील सुमारे 2,000 लोकांचा सहभाग होता. यात सहभागी झालेल्या नागरिकांनी वातावरणीय बदलाची गंभीर परिस्थिती आणि त्याचा आपल्या जीवनावर होणार्या परिणामांबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध घोषणा देत संदेशही दिले.
या उपक्रमावर भाष्य करताना, *सुगी ग्रुपचे फाऊंडर आणि मॅनेजिंग पार्टनर श्री निशांत देशमुख म्हणाले*, “आपण सर्वजणच अनियमित अशा हवामान बदलांच्या परिस्थितीचा सामना करीत आहोत मग तो अवकाळी पाऊस असो, वाढते तापमान असो, समुद्राची वाढती पातळी असो, विविध प्रजाती नष्ट होणे असो किंवा बर्फ वितळणे असो. पृथ्वीवरील तापमान बदलाचे दृष्य परिणाम चिंतित करणारे आहेत. यावर आजच तातडीची उपाययोजना करणे गरजेचे आहे. आमची संस्था पर्यावरणाप्रती संवेदनशील असल्याने, वॉकेथॉनच्या माध्यमातून लोकांना हवामान बदलांच्या समस्येबाबत जागरूक करण्याच्या हेतूने आम्ही या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. यातून बोध घेऊन प्रत्येकजण किमान वैयक्तिक पातळीवर हवामान बदलाचा प्रभाव कमी व्हावा म्हणून कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आपापल्यापरीने काही प्रयत्न करू शकेल.”
*महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष श्री. जय शृंगारपुरे म्हणाले,* “आमच्या मार्फत विविध पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण उपक्रमांतर्गत समुद्रकिनारे स्वच्छता मोहीम, खिळेमुक्त वृक्ष मोहीम, प्लॅस्टिक पुनर्वापर, इत्यादी उपक्रम सातत्याने सुरूच आहेत. हवामान बदलाच्या सामुदायिक समस्येच्या जागरूकतेसाठी समाजातील विविध घटकांना एकत्र आणत आम्ही लोकांना हवामान बदलाच्या कारणासाठी चालण्याचे आवाहन या वॉक-थॉनमधून केले. पर्यावरण संवर्धनासाठी असलेल्या समान संवेदनेतूनच सुगी ग्रुपने नेहमीच आम्हाला खूप पाठिंबा दिला आहे.”
सुगी समूह गेली सहा वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेसोबत विविध पर्यावरणाशी संबंधित व सामाजिक मोहिमांमध्ये सहभागी होत आहे. अलीकडेच, सुगी ग्रुपने महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेला सहकार्य करीत दादर बीच क्लीन – अप उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.
दुसरीकडे, आजपावेतो महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना आपल्या समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमांमध्ये 80,000 हून अधिक स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्यात यशस्वी झाली आहे. तसेच, आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांवरील 9,000 टनांहून अधिक प्लास्टिक आणि इतर कचरा महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने लोकसहभागातून साफ केला आहे. गेल्या वर्षी समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेला सन्मानित केले गेले आहे. मनसे आजमितीला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील 40 समुद्रकिनाऱ्यांवर महिन्यातून किमान दोनदा समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम राबवत आहे.
प्लॅस्टिक रिसायकलिंग कार्यक्रमासह, मनसेने मुंबईतील निवासी संकुलांमधून गोळा केलेल्या 1,000 टनांपेक्षा जास्त प्लास्टिकचा पुनर्वापर केला आहे. राज्यभरात विविध वृक्षारोपण मोहिमेंच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत 1,500 हून अधिक वृक्षारोपण केले आहे.
*सुगी ग्रुप बद्दल:*
1986 मध्ये स्थापन झालेला सुगी ग्रुप हा तीन दशकांहून अधिक काळ मुंबईच्या बांधकाम क्षेत्रात नावाजलेल्या असून आज मुंबईतील वेगाने वाढणाऱ्या बांधकाम व्यवसाय समूहांपैकी एक आहे. प्रीमियम आणि आलिशान घरे देण्यासाठी निवासी प्रकल्पांच्या पुनर्विकासावर लक्ष केंद्रित करून सुगी समूहाने मुंबईच्या प्रस्थापित परिसरांमध्ये प्रीमियम ठिकाणी विविध प्रकल्प उभारले आहेत.
सोळा दशलक्ष चौरस फूट पूर्ण, चालू आणि आगामी प्रकल्पांसह, सुगी ग्रुप घरे बांधण्यासाठी ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनावर विश्वास ठेवते. चिकाटी, सचोटी आणि पारदर्शकतेच्या बळावर आठशेपेक्षा जास्त आनंदी कुटुंबांना घरे वितरीत करण्यास सुगी ग्रुप यशस्वी ठरला आहे.