मुंबई : सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी अनिल डिग्गीकर यांनी जेएनपीएच्या चेअरमन पदी काम पाहिले आहे. यामुळे उरण पनवेल मधील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा विश्वास वाटत आहे. अनिल डिग्गीकर यांनी सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे अनिल डिग्गीकर यांनी आज सिडकोचे पूर्वीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडून स्वीकारली आहे.
अनिल डिग्गीकर यांनी १९९० रत्नागिरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक कार्यकारी पदे भूषविली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त, पुणे येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे (महाऊर्जा) महासंचालक, बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव व विशेष कार्य अधिकारी अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत.
सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी अनिल डिग्गीकर हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होते. अनिल डिग्गीकर यांनी सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाल्याने उरण पनवेल मधील प्रकल्पग्रस्तांचे सिडको संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याची जाण ते जेएनपीएचे चेअरमन असताना आहे, त्यामुळे हे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास येथील प्रकल्पग्रस्तांना वाटत आहे.