कामोठे चेकनाका येथे सतरा लाखांची रोकड जप्त

पनवेल दि.6: पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी आचारसंहिता लागू झाली आहे. यानुसार पनवेल मतदारसंघ, निवडणूक विभागांतर्गत आचारसंहिता पथकांतर्गत स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक 3 (एसएसटी पथक) ने पनवेलजवळील कामोठे चेकनाका येथे नियमित वाहन तपासताना सायन पनवेल हायवे रोडवरून जाणाऱ्या ग्रॅन्ड विटारा पांढऱ्या रंगाच्या गाडीची तपासणी केली. यात कापडी पिशवीमध्ये 17 लाखाची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम संशयास्पद असल्याने ही रक्कम पथकामार्फत जप्त करण्यात आली.

ही कारवाई पनवेल महानगरपालिका निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभाग 11, 12, 13 चे निवडणू‍क निर्णय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्याद्वारे ही तक्रार देण्यात आली. या कारवाईवेळी आचारसंहिता पथक प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, समन्वय अधिकारी तथा उपायुक्त रविकिरण घोडके, समन्वयक तथा अधिक्षक मनोज चव्हाण, पथक प्रमुख स्थिर सर्वेक्षण पथक क्र. 3 ग्रामविकास अधिकारी, सुदिन धनाजी पाटील, पथक सदस्य नरेंद्र गावंड, प्रशांत फडके, कामोठे पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई जितेश नवघरे, श्रीवंता अक्षय सुर्यवंशी उपस्थित होते.

या तक्रारीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीसाठी आयकर विभागास सूचित करण्यात आले असून त्याच्यावतीने पुढील प्रक्रिया सुरू आहे.

पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक, व्हिडिओ व्हिव्हींग पथक अशा सर्व पथकास सजग राहून कडक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *