पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 -26

पनवेल,दि.5 : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूका भयमुक्त, निष्पक्ष व शांततेतहोण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने कार्यरत रहावे अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे (भाप्रसे) यांनी आज दिल्या. निवडणू संदर्भात आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सर्व संबधित विभागांची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी निवडणूक निरीक्षक मनिषा कुंभार , निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे, आयकर कर शुल्क विभागाचे सह आयुक्त डॉ. अमित मुंडे (आयआरएस), पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 प्रशांत मोहिते, पोलिस आयुक्त वाहतूक तिरूपती काकडे, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरीक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे म्हणाले पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा पहिला टप्पा यशस्वीपणे पुर्ण झाला असून योग्य पध्दतीने सगळी तयारी झाली आहे. तरीही ऐनवेळी येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्व तयारीची उजळणी करण्याच्या सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे (भाप्रसे) यांनी उपस्थित सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सर्वांनी प्रशिक्षण, मतदान यादी, पोलिस संरक्षण, मतदान केंद्रावरील साहित्य वाटप ,अशा सर्व गोष्टीची पडताळणी करावी असे सांगितले.

या बैठकित सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आगामी मतदानाच्या अनुषंगाने आतापर्यंत झालेली प्रक्रिया , तयारी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीसाठी केलेल्या नियोजनाची माहिती सांगितली. यामध्ये उमेदवारी अर्जांची छाननी, मतदान, अंतिम उमेदवारांची संख्या, ईव्हीएम मशीनची चाचणी, मतदान केंद्रांवरील व्यवस्था, मतमोजणी, प्रशिक्षण, आवयश्यक मनुष्यबळ, एक खिडकी कक्ष यांची माहिती दिली. तसेच आयोगाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

*पोलिस विभाग*

तसेच पोलिस आयुक्तांनी एसएसटी, व्हीएसटी, भरारी पथक अशा सर्व पथकांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष मतदाना दिवशी व मतमोजणी दिवशी केंद्रावर तैनात कराव्या लागणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांबाबत चर्चा केली. तसेच याबाबतच्या मागणीविषयीची माहिती सांगितली.

*राज्य उत्पादन शुल्क विभाग*

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आजपर्यत विविध गुन्ह्यांमध्ये 12 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबधितांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच रात्रीची गस्त बसेसची तपासणी, रल्वेची तपासणी करण्यात येत आहे.

*वाहतूक विभाग*

 वाहनांना परवानगी देण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून या पथकांमध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश असून यांच्या माध्यमातून प्रचार फेऱ्या, रॅली यामधील वाहनांना परवानगी दिली जात असल्याची माहिती वाहतूक पोलिस आयुक्तांनी दिली. तसेच पार्किंग व ट्राफिक बंदोबस्त् याविषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.

*विद्युत विभाग*

विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडणूक विषयक तयारी बाबत माहिती दिली. यावेळी मतदानाच्या दिवशी विद्युत विभागाने करावयाच्या तयारी बाबत मुख्य निवडणूक निरीक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले.

या बैठकीची प्रस्तावना निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी केले तर समारोप अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे यांनी केले. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त विक्रम कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक भानुदास फणसेकर, वायएस लोळे, बी.एस चोखवे, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, महापालिकेचे सर्व उपायुक्त तथा नोडल अधिकारी , राज्य विद्युत महामंडळाचे बकुल मानवतकर, सार्वजनिक बांधकाम विभागचे उपअभियंता मिलींद कदम, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, सर्व पोलिस स्थानकांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *