शास्ती माफी लवकरात लवकर लागू करा- आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी 

पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या टॅक्सच्या संदर्भामध्ये नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

        या बैठकीमध्ये शास्ती माफीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली असता शास्ती माफी लवकरात लवकर लागू करावी, जास्तीत जास्त शास्ती माफी देण्यात यावी आणि त्याचबरोबर पूर्वीच्या काळात ज्या मालमत्ताधारकांनी शास्ती भरली आहे त्यांनाही पुढे भरायच्या करामधून आधी भरलेल्या शास्तीची रक्कम वगळण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. या संदर्भामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नागरिकांनी भरलेली शास्ती पुढील टॅक्स भरणातून वगळण्यात आल्याची प्रकरणे असल्याबाबत माहिती दिली व त्याचा अभ्यास करून याबाबत पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना दिलासा द्यावा अशा पद्धतीची मागणी केली. या संदर्भामध्ये शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा आमदार प्रशांत ठाकूर यांनी या बैठकीत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

File not found.