ऐरोली विधानसभेचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांचा गणेश नाईकांवर घणाघात!

नवी मुंबई : परिवर्तन महाशक्ती आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार अंकुश कदम यांनी पत्रकार परिषद घेत गणेश नाईक आणि घराणेशाहीवर घणाघाती टिका केली. घराणेशाहीने बरबडलेलं नवी मुंबईचं सत्ताकारण खोडून काढण्यासाठी आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व नवी मुंबईकरांना देण्यासाठी स्वराज्य मैदानात उतरलं आहे, नवी मुंबईतील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फक्त आणि फक्त स्वतःच्या घराचा विकास करत आहे, सर्व सामान्यांच्या प्रश्नांची यांना काहीही पडली नाही, असं मत यावेळी अंकुश कदम यांनी व्यक्त केलं.

ऐरोली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक मुद्दे, झोपडपट्टी मुक्त नवी मुंबई करून झोपडपट्टी धारकांना स्वतःची घरं बांधून देणं, गंभीर बनलेला रोजगाराचा प्रश्न सोडवणं, परवडणारी शिक्षण व्यवस्था उभारणं, उत्तम आरोग्य सेवेच्या माध्यमातून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती करणं, पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा काढणं, माथाडी कामगारांच्या पेन्शनचा मुद्दा.. तसंच महावितरणच्या मनमानी कारभाराला सर्वसामान्यांची ताकद दाखवणं.. आणि महत्वाचं म्हणजे एकाच घराण्याची आणि प्रस्थापितांची मक्तेदारी खोडून काढणं या आणि अशा बऱ्याच प्रश्नांवर आगामी काळात काम करायचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अंकुश कदम हे निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

दादागिरीने स्वराज्यच्या पदाधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार

नवी मुंबईमध्ये स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून सुरु असलेले पक्षबांधणीचे काम थांबवण्यासाठी स्वराज्यच्या पदाधिकाऱ्यांना धमकावण्याचे काम नाईकांकडून केले जात आहे. याविषयी बोलताना, दुसऱ्यावर दगडी मारताना आपली घरं काचेची आहेत, हे लक्षात ठेवावं असा इशारा अंकुश कदमांनी नाईकांना दिला. तसंच इथून पुढे स्वराज्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं देखील मत त्यांनी व्यक्त केलं.

‘तो येतोय’ बॅनरमुळे नाईकांना लागली मिरची

काही दिवसांपूर्वी ‘तो येतोय’ अशा आशयाचे बॅनर स्वराज्य पक्षाकडून लावण्यात आल्यानंतर नायकांनी दबाव तंत्र वापरून हे बॅनर काढण्यासाठी रविवारच्या दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्यांना कामाला लावलं. या बॅनरमुळे नाईकांना मिर्च्या झोंबल्याचे विधान माध्यमांशी बोलताना त्यांनी केले.

घरातलाच मंत्री, घरातलाच आमदार, घरातलाच खासदार, घरातलाच महापौर, घरातलीच नगरसेविका करून नवी मुंबईची सत्ता यांनी आपल्या घराण्यापूर्ती मर्यादित ठेवली आणि म्हणूनच नवी मुंबईतील भ्रष्टाचार, कंपन्यांमधील हप्ते, राजरोसपणे सुरु असलेला मनमानी कारभार हा सुरु आहे, असं देखील ते यावेळी म्हणाले.

२५ ऑक्टोबरला युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत अंकुश कदम भरणार उमेदवारी अर्ज

विधानसभा निवडणूकीसाठी ऐरोली विधानसभा मतदारसंघातून येत्या 25 तारखेला अंकुश कदम उमेदवारी अर्ज दाखल करणार असून युवराज शहाजीराजे छत्रपती हे यावेळी उपस्थित असतील अशी माहिती त्यांनी यावेळी माध्यमांना दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *