लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वखर्चातून न्हावे गावात जलकुंभ, महिला मंडळाचे कार्यालय आणि व्यायाम शाळेचे नुतणीकरण

पनवेल (प्रतिनिधी)माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वखर्चातून न्हावे गावात जलकुंभ, महिला मंडळाचे कार्यालय आणि व्यायाम शाळेचे नुतणीकरण ४० लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात आला असून या कामांचा शुभारंभ सोहळा मंगळवारी आयोजीत करण्यात आला होता. या कामांचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते झाला. यावेळी त्यांनी न्हावे गाव ही माझी कर्मभुमी असून गावासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असे प्रतिपादन केले.

पनवेल तालुक्यातील न्हावे गावातील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत होती. याबाबात गावातील महिलांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. त्यांच्या समस्येची दखल घेऊन ३० लाख रुपयांची मदत केली होती. या निधीमधून न्हावे गावात जलकुंभ बांधण्यात आला आहे. या जलकुंभाची १ लाख १० लिटरची क्षमता असून या जलकुंभाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते झाले. या जलकुंभ उभारण्याकरीता नंदकिशोर भोईर आणि नितीन भोईर यांनी जागा दिली असून त्यांचा या उद्घाटनावेळी मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान न्हावे गावातील वनीता महिला मंडळाच्या कार्यालयाचे तसेच व्यायाम शाळेचे नुतकरी करण्यात करण्यात आला आहे. यासाठीही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी १० लाख रुपयांची मदत केली त्यांच्याच हस्ते नुतणीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे आणि व्यायाम शाळेचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यहस्ते लोकार्पण करण्यात आले. या विकासकामांच्या शुभारंभावेळी ज्येष्ठनेते वाय. टी. देशमुख, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, सरपंच हरेश्वर म्हात्रे, उपसरपंच प्रल्हाद पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागरशेठ ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्या योगीता भगत, भाजप वाहतूक सेलचे हेमंत ठाकूर, सी.एल. ठाकूर, मनिषा पाटील, गव्हाणच्या माजी सदस्या स्नेहलता ठाकूर, जयवंत देशमुख, किशोर पाटील, सुहास भगत, प्रमोद कोळी, गाव अध्यक्ष तुषार भोईर, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र भोईर, विजया ठाकूर, महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनाक्षी पाटील, मंजुषा ठाकूर, माजी अध्यक्ष किशोर घरत, संजय ठाकूर, चंद्रकांत पाटील, रंजना घरत, कमलाबाई म्हात्रे, सुशीला पाटील, राकेश पाटील, राजेश म्हात्रे, नवनाथ म्हात्रे, भुषण भोईर, आर.ऐ.म्हात्रे, बाळुशेठ भोईर, किशोर भोईर, गायकवाड गुरुजी प्रकाश कडू, राजेश घरत, उत्त्म म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गावातील विकास कामांसाठी ४० लाख रुपयांची मदत केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *