राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडून फरार घोषित केलेल्या गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी केले जेलबंद

दिनांक १८/७/२०२३ रोजी शास्त्रीनगर बीट मार्शल वरील पोलीस अंमलदार, प्रदीप चव्हाण व अमोल नजन हे शास्त्रीनगर पोलीस चौकी हद्दीत रात्रगस्त घालत असताना रात्री अडीच वाजता त्यांनी तीन संशयित दुचाकी चोरांना ताब्यात घेऊन रात्रपाळीचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी यांना कळविले. त्यानंतर त्यांनी पोलीस अंमलदार बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शीतकाल यांची टीम तयार करून, संशयित इसमांना घर झडतीसाठी नेण्यात आले. घर झडती मध्ये एक जिवंत काडतूस, चार मोबाईल, एक लॅपटॉप व इतर कागदपत्रे मिळून आली. त्यामध्ये संशयित हे देश विघातक कृत्यास सहभागी असल्याचा संशय आल्याने, अधिक तपास करता ते राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (एन आय ए) फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे विरुद्ध कोथरूड पो स्टे येथे गुरनं.१७५/२०२३ , भा.दं.वी.सं. कलम ४६८, ३७९, ५११, ३४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), ४ (२५), महाराष्ट्र पोलीस एक्ट क. ३७ (१), ३७ (३) , १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मा.पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- ०3, पुणे, श्री. सुहेल शर्मा यांनी वरील कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर येथे बोलावून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला आहे. तसेच यापुढे देखील त्यांनी अशीच उत्तम कामगिरी करावी यासाठी मार्गदर्शन केले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *