पनवेल : आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपलिकेच्या सर्व 11 शाळांमध्ये बालदिनानिमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. अत्य्ंत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी बालदिन उत्साहात साजरा केला.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने सर्व शाळांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गीत गायन स्पर्धा, भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, समुहगीत स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
लोकनेते दि.बा पाटील शाळेमध्ये इनरव्हिल क्लब ऑफ पनवेलच्यावतीने बालदिनानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला. शिक्षण विभाग प्रमुख बाबासाहेब चिमणे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सर्वच शाळांमधील मुलांनी यानिमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आनंदी वातावरणात बालदिन साजरा केला.
चौकट
महापालिका मुख्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्ताने अभिवादन
पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर,उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त कैलास गावडे मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, लेखापरिक्षक विनयकुमार पाटील, सामान्य् प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.