” मराठी उद्योग सम्राट पुरस्कार 2022 या पुरस्काराने श्री.संग्राम विलासराव पाटील सन्मानित..!!!

वाशी-  वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या सभागृहात Saturday Club Global Trust च्या वतीने त्यांच्या वर्धापन दिनानिमित्ताने मराठी उद्योजकता दिवस सोहळा नुकताच पार पडला गेला.

या सोहळ्याला भारत सरकारचे केंद्रीय मंत्री श्री.नारायण राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्या प्रसंगी नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि तेजस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स चे सर्वेसर्वा श्री.संग्राम पाटील साहेब यांना बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल

“मराठी उद्योग सम्राट पुरस्कार” या मानाचा पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री.नारायण राणे साहेब यांच्या हस्ते देण्यात आला.

या प्रसंगी हावरे ग्रूप चे सर्वेसर्वा श्री. सुरेश हावरे साहेब, निर्माण ग्रुपचे श्री.अजित मराठे साहेब, Saturday club चे अध्यक्ष श्री. अशोक दुगाडे साहेब,

श्री.रामदास माने,श्री.मनोज पाटील, श्री.संतोष पाटील, श्री.श्रीकृष्ण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सदरचा पुरस्कार स्विकारताना श्री. संग्राम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सदरचा पुरस्कार हा माझ्या कुटुंब आणि कंपनी चे सर्व स्टाफ यांना समर्पित केला आहे असे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *