महिला नामे एलिझाबेथ रवी वय 45 वर्ष राहणार भवानी पेठ यांनी दिनांक १२/१०/२०२३ रोजी त्यांच्या मुलीला जहांगीर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते . तेथून रिक्षाने घरी येत असताना त्यांची सॅक रिक्षात विसरल्या होत्या . सदर बॅगेत एक *लॅपटॉप* तसेच मुलीच्या शस्त्रक्रिया करिता लागणारे *दीड लाख रोख* रुपये होते . त्यावेळी गस्ती वरील *डी.बी* . पथकातील अंमलदार यांना सदर महिलेने घडलेला प्रकार सांगितला. विशेष म्हणजे मुलीच्या शस्त्रक्रिये साठी त्यांनी कर्ज घेतले होते . आणि तीच रक्कम रिक्षात विसरल्याने त्या अतिशय *हवालदिल* झाल्या होत्या . सदर महिलेवर ओढवलेला प्रसंग बघून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि राऊत सर तसेच स पो नी जाधव सर यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील तळेकर, चव्हाण, वाबळे,कुडले व इतर सर्व डी बी स्टाफ यांनी सुमारे *70 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज* तपासून सदर रिक्षा चा क्रमांक मिळवून मंगळवार पेठ येथून सदरची ऑटोरिक्षा चालकासह ताब्यात घेतली व रिक्षातील लॅपटॉप व दीड लाख रोख रक्कम असलेली सॅक व पो नि श्री माने सर यांच्या हस्ते सदर महिलेच्या स्वाधीन करण्यात आली .
उपचारासाठी कर्ज काढून आणलेली अचानक गहाळ झालेली मोठी रक्कम खडक पोलीसांनी परत मिळवून देताना दाखवलेली *संवेदनशीलता व कौशल्य* पाहून एलिझाबेथ रवी यांनी खडक व पुणे पोलिसांचे *शतशः आभार मानले .