डोंबिवली / प्रतिनिधी : मानपाडा पोलीस ठाण्याच्या हददीत डिलक्स प्लायवुड डोबिवली पुर्व या दुकानाचे मालक श्री. हिम्मत शेषमल नाहर रा.डोंबिवली पुर्व हे दिनांक ०३/०८/२०२२ रोजी त्यांचे दुकानात हजर असताना आरोपी संजय विश्वकर्मा याने जुन्या ओळखीने त्यांचे दुकानात येवून ३ लाख रू.चे प्लायवूड खरेदी करण्याचा व्यवहार केला व व्यवहाराचे अॅडव्हान्स पैसे एटीएम मधुन पैसे काढुन देतो या बहाण्याने श्री हिम्मत नाहर यांना दुकानाचे बाहेर घेवून गेला. त्यावेळी त्याने येथील एटीएम बंद आहे. पुढच्या एटीएममधुन पैसे काढुन देतो असे बोलुन त्यांना एका गाडीमध्ये बसवून त्यांचा मोबाईल आरोपींनी काढुन घेतला व त्याचे अपहरण करून निघुन गेले. रात्रौ ०९.३० वा. श्री.हिम्मत नाहर यांचा पुतण्या जितु नाहर याचे मोबाईलवर आरोपींचा फोन आला, त्यांनी सांगीतले की, तुमचा काका आमच्या ताब्यात आहे. तो परत पाहिजे असेल तर ५० लाख रूपये तयार ठेवा. आम्ही एका तासात पैसे कोठे जमा करायचे याबाबत कळवतो. त्यानंतर फिर्यादी हे तात्काळ पोलीस स्टेशनला आले व घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ टिम तयार करून तांत्रिक तपासाव्दारे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले. प्रस्तुन प्रकारणात मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र. ५९०/२०२२ भादंवि कलम ३६४(अ), ३८७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीत यांनी श्री.जितु नाहर यांना दर तासांनी फोन करून पैसे घेवून वेगवेगळ्या ठिकाणी बोलाविले. त्यानंतर आरोपी यांनी श्री. जितु नाहर यांना शहापूर तालुक्यातील मुंबई आगरा रोडवरील गोठेघर गावाचे जवळील बोगदयाचे ठिकाणी पैसे घेवून येण्यास सांगीतले. त्याप्रमाणे लागलीच चार टिम तयार करण्यात येवून त्यांना गावातील लोकांचे पेहरावाप्रमाणे कपडे परीधान करून सदर ठिकाणी पाठविण्यात आले. तसेच श्री जितु नाहर यांना एक पैशांची बॅग तयार करून आरोपींना पैसे देण्यापुर्वी अपहरीत व्यक्तीला ताब्यात देण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे त्याने पैशांची बॅग घेवून बोगदयाजवळ उभा असताना एक झायलो कार सदर ठिकाणी आली. त्यातील व्यक्तींनी पैशांची मागणी केली असता त्याने त्याचे काकाला पहिले ताब्यात दया, मग पैसे देतो असे सांगीतले असता त्यांनी गावातील एका घरात त्यास ठेवले असल्याचे सांगीतले. त्यावेळी त्याने पैशाची बॅग देण्यास नकार दिला असता त्यांचेत बाचाबाची झाली त्यावेळी पोलीसांनी तात्काळ सदर गाडीस घेराव घालून आलेल्या तीन इसमांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांनी अपहरीत व्यक्तीला जवळच असलेल्या एका खोलीत ठेवल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे पोलीस पथकाने आरोपीसह गावात जावून आरोपीने दाखवलेल्या घराची पाहणी केली असता, सदर घरामध्ये आणखी एक आरोपी मिळुन आला. तसेच अपहरीत व्यक्ती यास पलंगाला दोरीने बांधुन ठेवले होते. सदर अपहरीत व्यक्तीची योग्य रितीने सुटका करून घेतली आहे. सदर घटनास्थळावरून एक आरोपी अंधाराचा फायदा घेवून पळून गेला आहे. सदर गुन्हयात आरोपी नामे १) संजय रामकिशन विश्वकर्मा, वय ३९ वर्षे, रा. डोबिवली पुर्व, २) संदिप ज्ञानदेव रोकडे वय ३९ वर्षे, रा. डोबिवली पुर्व, ३) धर्मदाज अंबादास कांबळे वय ३६ वर्षे रा. डोबिवली पुर्व, ४) रोशन गणपत सावंत, वय ४० वर्षे रा. डोबिवली पुर्व यांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन ५,३२,००० /- रू. ची झायलो कार व ४ मोबाईल जप्त केले आहेत. नमूद आरोपीत हे बेरोजगार असल्याने त्यांनी झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने सदर व्यापारी याची सर्व माहिती काढुन त्याचेकडुन पैसे उकळण्यासाठी सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरची कामगिरी मा. श्री. जयजीत सिंग, पोलीस आयुक्त ठाणे शहर, मा. श्री दत्तात्रय कराळे, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ — ३, कल्याण, मा. श्री. सुनिल कुराडे, सहा. पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शेखर बागडे, सपोनि / सुनिल तारमळे, सपोनि / अविनाश वनवे, पोहवा / राजेंद्र खिलारे, पोहवा / विजय कोळी, पोहवा / निसार पिंजारी, पोना / प्रविण किनरे, पोना / दिपक गडगे, पोना / यल्लपा पाटील, पोना / देवा पवार, पोना / प्रशांत वानखेडे, पोना / सुशांत तांबे, पोना / अशोक कोकोडे, पोशि / ताराचंद सोनावणे, पोशि / महेंद्र मंजा, पोशि / संतोष वायकर यांच्या पथकाने केली आहे.