कु स्नेहल माळी हि 28 वी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतात तिसरी

कु स्नेहल माळी हि 28 वी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतात तिसरी….
विजापूर कर्नाटक येथे 10 जाने ते 12 जाने 2024 रोजी झालेल्या 28 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत नवीमुबंई खारघर ची कु स्नेहल शत्रुघ्न माळी हिने दोन Bronze Meda पटकविले त्यात कु स्नेहल शत्रुघ्न माळी हिने अंडर 18 वयोगटात मध्ये 60 km सायकलिंग स्पर्धेत भारतात तिसरी आली (Bronze Medal ) तसेच 30km Road team time trial स्पर्धेत पण भारतात तिसरी आली (Bronze Medal ) असुन या स्पर्धेतीत सहभागी हे सर्व राज्य विजेते, भारतीय रेल्वे, संरक्षण सेवा, आशियाई खेळ, स्पोर्ट्स अथॉरिटी इंडिया, खेलो इंडिया खेलो चे 1200 खेळाडू सहभागी झाले होते या राष्ट्रीय स्पर्धेत स्नेहल माळीने दोन रौप्यपदक पटकावले याअगोदर राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत तिचे पाचवे पदक असुन कुरुक्षेत्र येथे सुवर्णपदक, पनवेल येथे कांस्यपदक आणि रांची सिल्व्हर पदक कु स्नेहल शत्रुघ्न माळी हिने पटकविले होते
स्नेहल माळीला सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष श्री प्रताप जाधव सर महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन चे संजय साठे सर राष्ट्रीय महिला प्रशिक्षक सौ दिपाली पाटील व फिनिक्स सायकलिंग क्लब पुणे चे प्रशिक्षक दर्शन बारगुजे व दिल्ली रेल्वे चे कोच राष्ट्रीय पदक विजेते राहुलसिंग ,रमेश गौतम यांचे बहुमोल मार्गदर्शन या तिच्या यशाबदल सर्व स्तरावरून तिचे आभिनंदन होत आहे स्नेहल शत्रुघ्न माळी हि पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी हिच्या कन्या आहे या तिचे यशाबदल पनवेल आमदार प्रशांतदादा ठाकूर,सीबीडी बेलापूर आमदार सौ मंदाताई म्हात्रे,नगरसेवक परेश ठाकुर, मा खासदार श्री.रामशेठ ठाकूर यांनी आभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *