नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटीलांचे नाव न दिल्यास सरकारला महागात पडेल दिबांच्या नावासाठी लाखो शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा वाद चांगलाच चिघळला आहे. विमानतळाला नाव लोकनेते दि.बा. पाटील यांचे की बाळासाहेब ठाकरे यांचे, यासाठी स्थानिक भूमीपुत्रांसह राजकीय नेतेमंडळीही आक्रमक होताना दिसून येत आहेत. या लढाईत खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आक्रमक होताना दिसून येत आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव दिले नाही तर लाखो शेतकऱ्यांसह मंत्रालयात घुसणार आणि जोपर्यंत दिबांचे नाव दिले जात नाही तोपर्यंत मंत्रालयातून बाहेर पडणार नाही असे प्रतिपादन स्वाभिमानि शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांनी केले. बेलपाडा येथील कार्यकर्ता मेळावा तसेच वृक्षारोपण व श्री वल्डेश्वर सांस्कृतिक हॉल च्या उदघाटन समारंभादरम्यान ते बोलत होते.
आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी देखील मोठ्या मनाने हेच सांगितले असते की विमानतळाला नाव दिबा पाटील यांचेच देण्यात यावे, असेही रविकांत तुपकर यांनी यावेळी अधोरेखित केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जालिंदर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, संघटनेचे नेते बापूसाहेब कारंडे, कार्यक्रमाचे आयोजक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर कडू यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *