पुणे येथे लोनी कालभोर येथे जुगरयाच्या अड्यावर पुणे पोलिसांची करवाई

याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात (Lonikalbhor Police Station)  गुन्हे (FIR) दाखल करण्यात आला आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन भागात संजय बडेकर याचा खेडकर मळा येथील एका हॉटेल शेजारी जुगार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहिती खातरजमा करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी स्वत:  पथकाबरोबर जाऊन याठिकाणी छापा टाकला. यावेळी येथे रम्मी चा खेळ सुरू होता. पोलिसांनी या सर्वांना पकडत चौकशी सुरू केली. यावेळी येथून 1 लाख 48 हजार रुपयांची रोकड आणि इतर साहित्य असा अडीच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. बडेकर याच्या क्लबला अनिल कांचन, अतुल उर्फ आप्पा कांचन व योगेश उर्फ बाळा कांचन हे चार पार्टनर असल्याचे सांगण्यात आले आहे. तर याठिकाणी तबल 15 कामगार देखील होते
ही कारवाई सुरू असतानाच युनिट सहाच्या पथकानेही काही अंतरावर सुरू असलेल्या मटका जुगारावर छापा टाकला आहे. येथून 12 व्यक्तींना पकडण्यात आले आहे.
हा मटका मंगेश कुलकर्णी या व्यक्तीचा असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
येथून 92 हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे
दोन्ही कारवाया एकत्र व एकाच वेळी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहरात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हंटले जात आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे,पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *