ATS प्रमुख जयजीत सिंह यांची ठाणे पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती; 3 अति वरिष्ठांच्या बदल्या

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या बदलीनंतर गेले तीन आठवडे रिक्त असलेल्या पोलीस आयुक्त पदी अखेर भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिकारी विद्यामान एटीएस प्रमुख जयजीत सिंह यांची ठाणे पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत आढळलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करत असताना एटीएसच्याच पथकाने सचिन वाझेच्या साथीदरांना जयजीत सिंग यांच्या नेत्रृत्वात अटक केली होती. आता त्याच जयजीत सिंग यांची बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग मंत्रालय मुंबई विनित अग्रवाल यांची एटीएस प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक, विशेष अभियान, महाराष्ट्र राज्य संजय सक्सेना यांची प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग मंत्रालय मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले जयजित सिंह यांच्या नियुक्तीचे पत्र आज (सोमवार) निघाले. गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जयजीत सिंग यांची नियुक्ती लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावरुन महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख पदी करण्यात आली होती. 4 मे रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना महासंचालक पदावर बढती देत त्यांची नियुक्ती महाराष्ट्र पोलिसांच्या गृहनिर्माण मंडळात करण्यात आली. तेव्हापासून जयजित सिंह यांच्या नावाची चर्चा सुरु होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *