एक गोड दिवस फ्रंटलाईन वर्करांनसाठी मनसे भेट

*एक गोड दिवस फ्रंटलाईन वर्करांनसाठी मनसे भेट*

मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना व महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे बाळासाहेब शिंदे यांच्या वतीने एपीएमसी सुरक्षा रक्षक व सफाई कामगारांना ड्रायफ्रूट( सुका मेवा )यांचे वितरण करण्यात आले .

काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी ठाण्यातील कोव्हिडं सेंटरला भेट दिल्यावर पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून दर्जा मिळावा म्हणून राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे तशी विनंती देखील केली.
याच मुद्द्यावर पत्रकार बांधवांना मनसे कामगार सेनेचे सहचिटणीस बाळासाहेब शिंदे यांनी नवी मुंबईतील पत्रकारांना किट नव्हे तर मनसे भेट ड्रायफ्रूट(सुकामेवा) देऊन पत्रकारांना स्वतःची काळजी घेत काम करण्याची विनंती केली.

याप्रसंगी नवी मुंबई उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे तशेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कार्यकारिणी सदस्य सत्यवान गायकवाड,विनायक जाधव , तसेच मनसे कार्यकर्ते आशिष मोरे , मानव वाघमारे , सुरेश सावंत हे पदाधिकारी उपस्थित होते .

*बाळासाहेब शिंदे*
*प्रदेश उपाध्यक्ष* – *महाराष्ट्र* *नवनिर्माण माथाडी कामगार सेना*
*प्रदेश सहचिटणीस* – *महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना*

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *