वादळामुळे मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, अहमदनगर, सातारा व औरंगाबादसह महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी केबल व इंटरनेट यंत्रणा बाधीत झाल्याने, महाराष्ट्रातील संपर्क यंत्रणा कोलमडली.

सर्वाधिक फटका मुंबई’ रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर
या सागरी जिल्ह्यांना बसला. झाडे मुळापासून उन्मळून पडल्याने हवेतील फायबर वायरसह भूमिगत फायबर वायरही मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर व ठाणे जिल्ह्यात वीजप्रवाह खंडित झाल्याने बहुतांश जिल्हे अंधारात.
शहरी भागात केबल व इंटरनेट सेवा पूर्ववत होण्यास २४ तास तर निमशहरी व ग्रामीण भागात एक आठवड्याहून जास्त काळ लागण्याची शक्यता. गेल्या वर्षी निसर्ग वादळात नुकसानग्रस्त केबलचालकांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही पंचनामे करण्यात आले नाहीत. त्यामुळे केबल व इंटरनेट चालक सरकारी नुकसान मदतीपासुन वंचित राहिले. केबलचालकांच्या जिवावर हजारो कोटींचा जाहिरात महसूल कमाविणाऱ्या उपग्रह वाहिन्या व बहुविध यंत्रणा परिचालकांकडूनही केबलचालक बेदखल.
प्रत्येकवेळी आणीबाणीच्या काळात सरकारसोबत ठामपणे उभे राहणार्‍या अत्यावश्यक सेवा केबल व इंटरनेट चालकांना यावेळीतरी नुकसानभरपाई मिळावी अशी शिव केबल सेनेकडून आग्रही मागणी .
विनय (राजू) पाटील
(सरचिटणीस)
शिव केबल सेना, महाराष्ट्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *