पुण्यातील नाना पेठेतील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; 3 पत्ती जुगार खेळाताना 24 जण आढळले, दोघा चालकांसह 26 जणांविरूध्द गुन्हा, 14 मोबाईल अन् 2.18 लाखाचा माल जप्त
शहरातील नागझरी लगत असलेल्या नाना पेठेतील हॉलमध्ये सुरू असलेल्या मोठया जुगार अड्डयावर पोलिसांनी शनिवारी (दि.26 डिसेंबर) रात्री छापा टाकला. पोलिसांनी हॉलमध्ये तब्बल 24 जण 3 पत्ती जुगार खेळत असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी जुगार अड्डा चालविणार्या सोमनाथ सयाजी गायकवाड (36, रा. सर्व्हे नं. 38, नाना पेठ) आणि अशोक सिंग अंबिका सिंग (36, रा. गोपी चाळ, दापोडी) यांच्यासह 26 जणांविरूध्द समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जुगार अड्डयावरून तब्बल 2 लाख 18 हजार 680 रूपयाचा ऐवज तसेच 58 हजार 500 रूपये किंमतीचे 14 मोबाईल हॅन्डसेट जप्त केले आहेत. 26 जणांविरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4, 5 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यापुर्वीच अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त (परिमंडळ-1) प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी यापुर्वीच झोन-1 मधील सर्वच पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना हद्दीमध्ये कुठलाही अवैध प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बेकायदेशीररित्या चालणार्या प्रत्येक गोष्टींवर कारवाई करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. नाना पेठेमध्ये चालु असणार्या बाबींची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तेथे कारवाई केली आहे. आगामी काळात देखील झोन-1 मध्ये बेकायदेशीररित्या बाबींवर तात्काळ आळा घालण्यात येणार असल्याचं उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी स्पष्ट केलं
खालील 26 जणांविरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4,5 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.