माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन

माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचा दरवर्षीचा उपक्रम

पनवेल/ प्रतिनिधी :
आदिवासी समाजातील गोरगरीब कुटूंबांना अल्प दरात दिनदर्शिका उपलब्ध करू देण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी “आदिवासी दिनदर्शिका” प्रकाशित करीत असते. या आदिवासी दिनदर्शिकेमध्ये समाजातील क्रांतिकारक, सन- उत्सव, अन्य माहितींचा उल्लेख व नोंद केल्या जात असतात. शिवाय, दरवर्षी प्रमाणे आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने २०२१ या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन रविवार (२७ डिसें) रोजी माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत असतांना गणपत वारगडा हे समाजातील वृत्तपत्र “आदिवासी सम्राट”चे संपादक आहेत. त्यांनी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेची स्थापना करून समाजातील अनेक लोकांना न्याय देण्याचे काम करत असतात. गणपत वारगडा हे २० व्या वर्षापासून समाजाचे काम करत आहेत. आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या संघटनेच्या शाखा रायगड जिल्हा, पुणे जिल्हा, नवी मुंबई जिल्हा तर आता ठाणे जिल्ह्यात सुध्दा त्यांच्या संघटनेच्या शाखा आहेत. त्यामुळे आदिवासी दिनदर्शिका ही समाजातमध्ये सर्वञ पोहोचण्यास सोयीस्कर होत असते. त्यामुळे पञकार गणपत वारगडा यांना समाजात मोलाचे स्थान आहे, असे ही आदिवासी दिनदर्शिकेच्या प्रकाशनाच्यावेळी माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ पत्रकार, दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू, क्रियाशील प्रेस क्लब पनवेलचे अध्यक्ष अकबर सय्यद, पनवेल तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, दैनिक रायगड नगरीचे अरविंद पोतदार, आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र सचिव सुनिल वारगडा, आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हाध्यक्ष बुधाजी हिंदोळे, रायगड जिल्हा सचिव गणेश पारधी, पञकार राज भंडारी, पञकार रवी गायकवाड, पञकार साहिल रेळेकर, पञकार सनीप कलोते, पञकार विशाल सावंत आदी. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *