सतत पाठपुरावा करून पालघर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन ने केले जुगारावर छापामारी गुन्हेगारांना केले जेरबंद
दिनांक १९/०८/२० रोजी १७.२५ वाजताचे सुमारास केवळा पोलीस ठाणे हद्दीतील लिटल लिफ रिसॉर्ट मध्ये काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर ठिकाणी केळवा पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला असता, आरोपी नामे १) जितेंद्र यशवंत चौधरी , वय-४९ वर्षे, २) दर्शन जयेश राऊत, वय-३२ वर्षे, ३) कृपेश विनोद वर्तक, वय-३० वर्षे, ४) निनाद प्रकाश पाटील, वय-३६ वर्षे, ५) संदीप भगवान किणी, वय-४२ वर्षे, सर्व राहणार रा.माहीम ता.जि.पालघर यांनी मनाई आदेशाचे उल्लघंन करुन जियीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयीची कृती करुन तीन पत्ती नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना मिळुन आले. आरोपी यांच्या ताब्यातुन जुगार खेळण्याचे साहीत्य व रोख रक्कम असा एकुण ७८,९००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी यांच्या विरुद्ध केळवा पोलीस ठाणे गु.र.नं. ाा ४२/२०२० भा.दं.वि.सं.कलम २६९, १८८ सह आपती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१(ब), साथीचे रोग कायदा कलम ३, महा.जुगार प्रति.कायदा १८८७ चे कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी क्रमांक १ ते ५ यांना अटक करुन जामीनावर मुक्त केले आहे.
सदरची कारवाई ही सहायक पोलीस निरीक्षक श्री.मानसिंग पाटील, केळवा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली केळवा पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.