मयताच्या टाळूवरील लोणी खाणारे बडे रुग्णालय बड्या रुग्णालयात मृत झालेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर लावले

निलेश पाटील/नवी मुंबई

गब्बर इज बॅक नावाचा एक सिनेमा वैद्यकीय उपचार देणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेवर भाष्य करतो.उपचारादरम्यान मृत्यू झाल्यावर देखील उपचार केल्याचं नाटक करून मृताच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्या डॉक्टरांच्या कार्यपद्धतीच बिंग फोडणारा अभिनेता मुद्दाम सगळी कृत्य माहिती होऊन डॉक्टर सांगतील तसं करत जातो.मात्र त्या पूर्वी मृत्यू सर्टिफिकेट हातात घेऊन या सगळ्या यंत्रणेशी गब्बर नावाचा हा हिरो लढा देतो.या सिनेमाशी साधर्म्य असणारा अनुभव नुकताच बेलापूर येथील एका बड्या रुग्णलयात रुग्णांच्या नातलगांना आला आहे.63 वर्षीय महिलेचा 27 जुलै रोजी सकाळी साडे सहा वाजता मृत्यू झाल्यावर देखील बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात सकाळी साडे अकरा वाजता ग्लुको मीटर, व्हेंटिलेटर व डॉक्टर व्हिजिटिंगच्या नावाखाली लाखो रुपयां बिल लावण्यात आल असल्याचे नातलगांच्या लक्षात आले.रुग्णालय व्यवस्थापन निर्लज्जपणे रुग्ण मृत झाल्यावर देखील पैसे आकारत असल्याची घटना उघडकीस आली आहे. मनपाचा आरोग्य विभाग सुस्त झोपला असल्याने खासगी रुग्णालय लूटमार करत असल्याचा तक्रारी रोज येत आहेत.ऑक्सिजन पॅरा तर दर मिनिटाला लावल्याचे भासवून त्याचे देयक जोडण्यात आले.मात्र देयकावर संशय असल्याने या देयकाची तपशीलवार पाहणी केल्यावर व्हेंटिलेटर तीन वेगवेगळ्या दराचे लावलेले दिसून आले.विशेष म्हणजे रुग्णाची तब्येत चिंताजनक असल्याने व्हेंटिलेटर लावणार नसल्याचे लिखित घेण्यात आले होते.ऑक्सिजन पॅरामीटर बाबत सुद्धा असाच प्रकार आढळून आला.मात्र तरीदेखील रुग्णालय व्यवस्थापन मात्र मुजोरी करत दिलेलं बिलाच तुणतुणे वाजवून मृतांच्या नातलगांना वेठीस धरत असल्याने अखेर नातलगांनी राजकीय नेत्यांकडे धाव घेतली.भाजपचे कृष्णा पाटील दत्ता घंगाळे व मनसेचे गजानन काळे या नेत्यांनी रुग्णालय व्यवस्थपणाला धारेवर धरले.बिलात लूट केल्याचं स्पष्ट दिसत असल्याने या नेत्यांनी रुग्णालय व्यवस्थपणाला हिसका दाखवत धारेवर धरले.अखेर यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने नमते घेऊन लूटमार करत लाखो रुपये दिलेले बिल कमी करून मृतदेह ताब्यात दिला.मात्र रुग्णांचा मृत्यू झाल्यावर देखील उपचार सुरू असल्याची नौटंकी करत लाखो रुपये उकळण्याचे उद्योग सुरू आहेत.सरसकट पैसे उकळणाऱ्या या खासगी रुग्णालयावर कोणाचाही अंकुश नसल्याने मनमानी सुरू आहे.राज्य शासन आरोग्य विभाग मनपा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांना हे खासगी रुग्णालय केराची टोपली दाखवत असल्याचे स्पष्ट होत आहे.विशेष म्हणजे मृतांच्या नावावर पैसे उकळणाऱ्या या वैद्यकीय व्यावसायिक कोणताही विधिनिषेध न बाळगता निर्लज्जपणे नातलगांना लुटत आहेत.नियम कायदे आणि शासनाच्या निर्णयांना कात्रजचा घाट दाखवत आहेत.

  1. सर्व नागरिकांना नम्र विनंती  डिस्चार्ज घ्यायच्या आत आपलं बिल तपासून पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *