खारघरच्या हार्मोनि शाळेचा प्रताप; फी भरली नाही म्हणून विद्यार्थीनिला लाईव्ह लेक्चर मधून काढले !

खारघर: देशासह राज्यात कोरोनाबधितांचा आकडा वाढतोय. कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प पडलेत. पनवेल महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाची साखळी रोखण्यासाठी 10 दिवसांची टाळेबंदी जाहीर केली आहे. 23 जुलै पर्यँत कडकडीत बंद असणार आहे.

अश्यात मध्यमवर्गीय कुटुंब जगावं कसं हा प्रश्न त्यांच्या समोर सतावत आहे. मात्र शाळा प्रशासनने आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. खारघरच्या से 36 येथील हार्मोनि शाळा प्रशासनाने फी साठी हुकूमशाही सुरूच ठेवली आहे.

कोरोनामुळे सर्वच शाळा बंद आहे, मात्र ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. हार्मोनि शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून ऑनलाईन क्लासेस बसू दिले जात नाहीये. दहावीचे वर्ष असल्याने पालक आणि विद्यार्थी ऑनलाइन क्लासेस पासून दूर ठेवल्याने धास्तावले आहेत.

शैक्षणिक वर्षाचे शाळांचे वर्ग सुरु झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने फी मागू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षणमंत्र्यांनी शाळांना दिल्या आहेत. तरीही हार्मोनि शाळेने आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. हार्मोनि शाळा प्रशासनावर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *