पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाउन-अजित पवार
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. आणखी १५ दिवस पुणे आणि पिंपरीत लॉकडाउन असणार आहे अशी घोषणा पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. दोन्ही शहरांमध्ये १५ दिवसांनी लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.
कंटेनमेंट झोन वगळता पुण्यातील काही भागात लॉकडाऊन शिथिल केला होता. मात्र, अद्यापही करोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. नियमांचं पालन न केल्यास पुणे आणि पिंपरीमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाउन घेण्यात येईल असं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
लोकांना करोनाचं गांभीर्य अद्यापही कळलं नाही. आज झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. पुढील दोन दिवसांमध्ये १५ दिवसांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे. ज्या लोकांना भाजीपाला किंवा अन्य काही वस्तू खरेदी करायच्या असतील त्या त्यांनी करून ठेवाव्यात. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. आपल्याला करोनाची साखळी मोडणं आवश्यक आहे, असं पवार यावेळी म्हणाले.