नाशिक जेलरोडला जुगार अड्ड्यावर छाप्यात ६८ लाखांच्या मुद्देमालासह २७ जुगाऱ्यांना अटक

नाशिक जेलरोड येथील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करून रोख रक्कमेसह 68 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून 27 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे

पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्या बरोबरच अवैध धंद्याकडे लक्ष केंद्रित केले असून त्या अनुषंगाने त्यांनी अधिकाऱ्यांना कारवाईबाबत आदेशीत केले आहे. आज सकाळी कैलासजी हौसिंग सोसायटी पाण्याच्या टाकी समोर, जेलरोड येथे सतीश रघुनाथ भालेराव (एस पी) हा बंदिस्त फ्लॅटमध्ये अवैधरित्या जुगार खेळवत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी सचिन भालेराव यांच्या फ्लॅटवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी 27 इसम जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले तर या कारवाईत 5 चारचाकी वाहने व बुलेट दुचाकी तसेच रोख रक्कम असे एकूण सुमारे 68 लाख 92 हजार 50 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

दरम्यान या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून 27 जुगाऱ्याना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी दिली. या निवासी इमारतीमध्ये अवैध जुगार अड्डा सुरू केल्याने सदर फ्लॅटचा भोगवटा रद्द होण्या बाबत तसेच पाणी वीज कनेक्शन कट करण्यासाठी संबंधित विभागाशी पत्र व्यवहार केल्याचेही पोलिसांनी सांगितले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. लोंढे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *