नव्या वर्षात सिडकोच्या पाच हजार घरांसाठी लॉटरी निघणार – एकनाथ शिंदे यांचे ट्विट द्वारे माहिती

CIDCO Lottery 2022 : सिडकोकडून 5000 घरांसाठी जानेवारी महिन्यात लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

CIDCO Lottery 2022 : परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. नवी मुंबईतील कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी आदी ठिकाणी ही घरे असणार आहेत.

नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांची ‘महागृहनिर्माण’योजना आहे. या घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे घरे उपलब्ध होणार आहेत. या घरांसाठीच्या लॉटरीची प्रक्रिया जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *