बेकायदेशीर बायोडिझल विक्री करणाऱ्या तीन जणांवर विरोधात गुन्हा- सात हजार लिटर बायोडिझल जप्त

 

जेएनपीटी : इंधनाचे दिवसेंदिवस भाव वाढत असल्याने अनेक वाहन चालक पर्यायी इंधनाचा वापर करत आहेत. उरण मध्ये देखिल अशा पर्यायी आणि स्वस्त इंधनाची विक्री बेकायदेशिरपणे होत आहे. अशाच प्रकारे बेकायदेशिरपणे बायोडिझलची विक्री करणाऱ्या दोन आरोपी विरोधात उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून सात हजार लिटर बायोडिझल जप्त करण्यात आले आहे. तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. प्रकाश देशमुख आणि कल्पेश माने अशी या दोन
आरोपींची नावे आहेत. हे दोघे उरण चिर्ले गावाजवळील कुणाल यार्डच्या बाजूला सिडकोच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे बायोडिझल विक्री करत होते. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांचे जवळ डिझेल विक्रीचा कोणताही परवाना नव्हता त्यामुळे बेकायदेशिर साठवणूक आणि विक्री केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ४ लाख ३३ हजार रूपये किंमतीचे ७ हजार लिटर बायोडिझल जप्त करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात उरण पोलिस ठाण्यात कलम २८५, ३३६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उरण पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *