रावेत मध्ये होणार पुण्यातील सर्वात उंच इमारत

पिंपरी चिंचवड : पुणे शहरात अनेक उंच इमारती आहेत ज्यामध्ये 20 मजल्यापासून 36 मजल्यापर्यंत उंच इमारती बनवण्याचे काम अनेक बांधकाम व्यवसायिकांकडून पुण्याच्या विविध भागांमध्ये हे काम सुरू आहे. सध्या एफ एस आय (F.S.I.) वाढवून दिल्याने बांधकाम व्यावसायिकांना उंच इमारती बांधण्याची परवानगी मिळाली असल्याने हे काम प्रगतीवर आहे.

कोठे आहे हा प्रोजेक्ट ?

पिंपरी चिंचवड मधील रावेत या भागात 40 मजल्याची इमारत होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने या इमारतीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे. हा एक रहिवासी प्रकल्प आहे.

पहिल्यांदाच इतका मोठा प्रोजेक्ट पिंपरी चिंचवड मध्ये उभरणार यासाठी लोकं मोठ्याप्रमाणात या प्रोजेक्टला हजेरी लावत आहेत

या प्रोजेक्टचे नाव काय ?

अर्बन स्कायलाईन नावाचे हे प्रोजेक्ट असून रावेत येथील बीआरटी रोडवर हा प्रकल्प स्थित आहे. पुण्यातील सर्वात उंच इमारतीत घर घेण्याची ही संधी असून पिंपरी चिंचवड मधील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखले जाणार असे या प्रोजेक्टच्या विकसकांचे म्हणणे आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *