वाहतूक कोंडी संदर्भात जनतेचा उद्रेक होण्याची वाट न पाहता जेएनपीटी बंदराने तात्काळ वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी – मंत्री एकनाथ शिंदे

 

ठाणे-बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर वाहनांची रात्री अपरात्री होणारी वाहतूक कोंडी त्यामुळे होणारा सर्व सामान्य जनतेला त्रास यांचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेएनपीटी बंदराच्या आसपासच्या रस्त्यांचा व येथील पार्किंग चा आढावा घेतला.याप्रसंगी मंत्री महोदयानी जेएनपीटी बंदराचे अधिकारी,सिडकोचे अधिकारी यांना तंबी देताना सांगितले की सततच्या वाहतूक कोंडीमुळे जनता बेजार झाली आहे.तरी वाहतूक कोंडी संदर्भात जनतेचा उद्रेक होण्याची वाट न पाहता जेएनपीटी बंदराने रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व पार्किंग संदर्भातील प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आदेश बंदराचे चेअरमन संजय सेठी,व्हा चेअरमन उन्मेष वाघ यांना दिले.

महाराष्ट्र राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार दि २९ सप्टेंबर रोजी जेएनपीटी बंदराच्या परिसराला भेट देऊन तेथील समस्यां जेएनपीटी बंदराचे चेअरमन संजय सेठी, तसेच सिडकोचे अधिकारी यांच्या उपस्थितीत जाणून घेतल्या, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उरण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.सदर पाहणी दौरा हा ठाणे-बेलापूर रस्त्यावरील सिडको व जे.एन.पी.टी. कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची होणारी ट्राफिक कोंडी तसेच पार्किंग प्रश्न यावर कशाप्रकारच्या उपाययोजना करण्यात याव्यात ज्यामुळे ट्राफिक व पार्किंग प्रश्न सुटेल यावर मंत्री महोदयांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच शिव – समर्थ स्मारक येथील मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करावी,आणि अनाधिकृत कंटेनर यार्डमूळे परिसरात होणारी पार्किंग वर कारवाई करावी असे आदेश पोलिस यंत्रणेला दिले.

यावेळी जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी दिनेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, विधानसभा संघटक सदानंदराव भोसले, तालुकासंघटक बी.एन.डाकी, शिवसेना गटनेता गणेश शिंदे, शिवसेना शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उपतालुकाप्रमुख प्रदिप ठाकूर, उपतालुकासंघटक के.एम. घरत, उपतालुकासंघटक अमित भगत, विभागप्रमुख संदेश पाटील, जि.प.सदस्य विजय भोईर, पं.स.सदस्य दिपक ठाकूर, पं.स.सदस्य हिराजी घरत, युवासेना विधानसभा अधिकारी नितेश पाटील, तालुका युवासेना अधिकारी हितेश पाटील, वैद्यकीय कक्षप्रमुख रमेश म्हात्रे, महिला उपजिल्हा संघटिका ममता पाटील, महिला विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, तालुका संघटिका(शहर) सुजाता गायकवाड, तसेच सिडको चे अधिकारी वर्ग, जे.एन.पी.टी. चे अधिकारी वर्ग, तहसिलदार, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, उपतालुकासंघटक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, सरपंच, ग्रा.पं. सदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *