*आजाद समाज पार्टी (महिला मोर्चा) च्या महिला आक्रमक*

पनवेल : महिलांवरील अत्याचाऱ्याच्या विरोधात पनवेल येथे ASP च्या माध्यमातून आक्रोश आंदोलन करण्यात आले.
शहरांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना महिला कुठेही सुरक्षित राहिली नाही. गाव आणि जिल्हा पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी मेळावे आणि शिबिर आयोजित करून जनजागृती केली जात असली तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर होत आहे. महिलांवरील अत्याचार, शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींची छेडछाड करून विनयभंग करणे, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, पुरुषांकडून महिलेस मारहाण अशा घटनामध्ये गेल्या काही दिवसात वाढ होताना दिसत आहे. महिला – मुली तरुणीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या अश्या नराधमांनावर वचक बसण्याकरिता *आझाद समाज पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा. नेहाताई शिंदे* यांच्या नेतृत्वाखाली *पनवेल तालुका अध्यक्षा रूपालीताई शिंदे* यांच्या वतीने पनवेल तहसील कार्यालय येथे जोरदार आक्रोश आंदोलन करण्यात आले, मुसळधार पाऊस असताना देखील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रूपालीताई शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की काहीही झाले तरी महिलांच्या न्याय हक्कासाठी नेहमी झगडणार, महिलेवर अत्याचार झाला तर आम्ही सहन करणार नाही आज आम्ही शांततेत आंदोलन केले भर पावसात मात्र लाखोंच्या संख्येने येण्यास आम्हला भाग पाडू नका, गेल्या काही महिन्यात महिलांवर अत्याचार विनय भंग ,बलात्कार व महिलेस पुरुषांन कडून मारहान झाली ह्यांचे तक्रार पोलीस ठाण्यात दाखल आहेत व आरोपी मोकाट आहे 1 महिन्यात जर ह्या सगळ्या केस मार्गी नाही लावल्या तर आम्ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी तीव्र आंदोलन करू. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे यांनी केंद्र सरकार व गुन्हा नोंद करताना पोलिस प्रशासनाची दिरंगाई यावर जोरदार प्रहार करत सांगितले की आम्ही संविधानाला मानणारे आहोत. कायद्याचे उल्लंघन करत नाही याचा अर्थ असा नाही की आम्ही दबावाला घाबरतो. जर केंद्र सरकार आणि पोलिस प्रशासन दखल घेत नसेल तर आम्ही महाराष्ट्र भर आक्रोश आंदोलनाची भिंत उभी करू. आजाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अॅड. भाई चंद्रशेखर आजाद यांचा आंदोलनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात महिलांसाठी आजाद समाज पार्टी महिला मोर्चा च्या वतीने रस्त्यावर उतरू.

जोरदार निदर्शनांनंतर तहसिलार साहेब आणि डीसीपी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनासाठी आजाद समाज पार्टी महाराष्ट्र अध्यक्षा मा. नेहाताई शिंदे, कोषाध्यक्षा राजश्रीताई अहिरे, रायगड जिल्हा संघटक जयश्रीताई पाटील, पनवेल तालुका अध्यक्षा रूपालीताई शिंदे, साईनगर विभाग अध्यक्षा विद्याताई जाधव, कळंबोली शहर उपाध्यक्षा संगिताताई कांबळे, नेरूळ शहर अध्यक्षा प्रमिला खंडागळे,श्रीमती.स्नेहा धुमाळ सौ.किरण अडागळे सौ.रत्नमाला पाबरेकर कु. प्रणाली नाईक, सौ.रुपाली सनस, कु.गार्गी गडगे ,
सौ. प्रणाली गडगे, वरिष्ठ कार्यकर्ते मा. सुदेश शिंदे सर, सुधीर वर्गट, चेतन साळवे, प्रकाश सोनवणे, दानिश शहा, प्रतिक मोहोड, विकी थोरात, तसेच अन्याय अत्याचार निर्मूलन समिती चे कोकण प्रदेश प्रमूख संतोष चाळके, यश झवर व अनेक बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *