ठाणे पोलिसांचा दिल्लीत डंका : ठाणे पोलिस दलातील चार अधीकार्यांना राष्ट्रपति तर एक विशेष पोलिस पदक

स्वतंत्रदीनी ठाणे पोलीस आयुक्तालयातील चार अधिकारयाना राष्ट्रपतिचे पोलिस पदक जाहिर झाली आहेत. नारपोली वाहतूक विभागातील पोलिस निरीक्षक कल्याण नारायणजी घेटे, ठाणे आयुक्तालय विशेष शाखेतील पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव रामचंद्र जाधव, शहर पोलिस मुख्यालयातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराज मानसिंग पवार, ठाने गुन्हे शाखा यूनिट एकचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आनंदा हरीभाऊ भिल्लारे आदींचा पदक जाहिर झालेल्या पोलिस अधिकारह्याचा समावेश आहे. पोलिस दलात गुणवत्ता पूर्वक सेवा बजावल्या बद्दल त्यांना हे पदक जाहिर झाले आहे. तर पोलीस निरीक्षक मनोहर पाटिल हे 15 ऑगस्टच्या शुभमुहूर्तवर सर्वोत्कृष्ट तपासी अधिकारी ठरले आहे. त्यांना केंद्रीय गृह मंत्री विशेष तपास पदक जाहिर झाले आहे. स्वातंत्र्यदिनी झालेल्या मान्यवरांच्या हस्ते त्यांना पदक देऊन गौरावन्यात आले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *