पोलिसांनी टाकलेत जाळे, लवकरच हाती लागणार काळे…..* *अटकेसाठी नवी मुंबईकरांकडून पोलिसांवर प्रचंड दबाव…

*पोलिसांनी टाकलेत जाळे, लवकरच हाती लागणार काळे…..*

*अटकेसाठी नवी मुंबईकरांकडून पोलिसांवर प्रचंड दबाव….*

*अटक नाही झाल्यास संजीवनी काळे यांच्यासाठी जनआंदोलन होण्याची शक्यता…..*

*आज सहावा दिवस उजाडला तरी देखील मनसे शहराध्यक्ष गजानन काळे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश नाही आलंय. वसुलीसाठी मनपा मुख्यालयात छातीठोकपणे घुसणारा काळे आता मात्र कुठल्या बिळात लपलाय याचा शोध पोलिस घेत आहेत. आपलं सरकार असून आपले मंत्री असून काळ महाविकास आघाडी मधील महिला पदाधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांची भेट घेण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. आता गृहमंत्र्यांपर्यंत हा विषय गेला असल्याने पोलिस ऍक्शन मोड मध्ये आली आहे. नवी मुंबई पोलिसांमार्फत पथक बनवून काळे याचा शोध घेतला जात असून आता अटकेची घटिका जवळ आल्याची माहिती सूत्रांकडून भेटतेय. लवकर अटक न झाल्यास नवी मुंबईकर रस्त्यावर उतरत जनआंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. संजीवनी काळे यांना सर्वपक्षीयांच्या सह सामान्य नागरिकांचा भेटत असलेला पाठिंबा प्रचंड असल्याने पोलिस आता कारवाई करतीलच असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *